भंडारा : जाणाऱ्या 133 गोवंशाची सुटका

Image Source By : Marathi Voice

भंडारा, 30 जुलै कत्तलीसाठी तब्बल 133 गोवंशांना बांधून ठेवणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत 133 जनावरांपैकी 11 जनावरांना वाहनात कोंबून ठेवण्यात आले होते. बालगोपाल दुरुगकर (49), लोकेश दुरुगकर (27, दोन्ही रा. आंबेडकर वॉर्ड शहापूर) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक तुरकुंडे यांच्या पथकाने आंबेडकर वॉर्ड शहापूर येथील बालगोपाल दुरुगकर यांच्या जुन्या घरासमोर धाड टाकली. या ठिकाणी दोरखंडाने बांधून ठेवलेले 133 जनावरे दिसून आले. त्यापैकी 11 जनावरे एका चारचाकी वाहनामध्ये कोंबलेले होते. या जनावरांना मुक्त करून गौशाळेत पाठविण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईत 133 जनावरांसह वाहन, असा एकूण 14 लाख 50 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.