हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली तुतारी!
- Source : Official
- Oct 04, 2024
पुणे, 4 ऑक्टोबर ।
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला एकापाठोपाठ हादरे देण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी विरोधकांच्या गडांना सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आज भाजपमधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या या निर्णयामुळे भाजपला इंदापूर मतदारसंघात मोठा फटका बसू शकतो. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.