सिंधुदुर्ग : इन्सुलित ५२ लाखाची दारू जप्त ; दोघे ताब्यात

Image Source By : Marathi Voice

सिंधुदुर्ग, 2 ऑगस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात इन्सुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५२ लाखाची दारू जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी सहा चाकी कंटेनर जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे

नोशाद इसराईल खान (२४ राहणार हरियाणा) व विश्र्नुकुमार जाट (२५ राहणार राजस्थान) यांना ताब्यात घेवून १८ लाखाचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालाची किंमत ७० लाख १३ हजार २०० एवढी आहे ही कारवाई मनोज शेवरे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवानदीपक वायझंडे व जवान वाहन चालक रणजीत शिंदे यांनी केली. या प्रकरणचा तपास प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर तपासणी नाका इन्सुली हे करत आहेत.