साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर कोठी, मार्केटयार्ड परिसरात औषध फवारणी

Image Source By : Marathi Voice

अहमदनगर, 3 ऑक्टोबर अहमदनगर शहरातील कोठी परिसर व मार्केटयार्ड रोड येथे वाढत्या साथीच्या आजारामुळे व डेंग्यू,चिकनगुनिया सारख्या आजारावर मात करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधून व अडी अडचणी समजून घेतल्या.आ.संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधून संग्राम भैय्या सोशल फाउंडेशन च्या उपक्रमामार्फत चालू असलेल्या औषध फवारणी करणारा पथक आमदारांनी पाठवून संपूर्ण परिसरात सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी स्वतः थांबून फवारणी केली .

यामध्ये अरिहंत कॉलनी,गुलाबसिंग कंपाऊंड परीसर,वीज बोर्ड परिसर,खालकर हॉस्पिटल परिसर,बॉईज हायस्कूल परिसर व मुले व मुली याच्या बोर्डिंग शाळेत देखील फवारणी करण्यात आली.त्यामुळे नागरिकांच्या वतीने आ.संग्राम जगताप व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांचे नागरिकांनी आभार मानले.