मुंबईत इमारत कोसळली: एका व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी !
- Source : digital satta
- Jul 20, 2024
मुंबई, २० जुलै मुंबईच्या ग्रँड रोड स्टेशन परिसरातील रुबूनिसा मंजिल इमारतीचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. इमारत चार मजली आहे आणि तिच्या बाल्कनीचे काही भाग कोसळले आहे. रुबूनिसा मंजिल इमारत जुनी असून, मुंबई महापालिकेने 6 महिन्यांपूर्वी तिला धोकादायक घोषित केले होते.
मुंबईत आज, शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसामुळे इमारतीच्या धोकादायक स्थितीला आणखी गंभीर परिणाम झाला आहे . या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अधिकारी आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू ऑपरेशन चालू असून, जखमींना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.या दुर्घटनेने मुंबईत मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे घडलेली ही पहिली मोठी घटना असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारची आणखी दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी पावसाळ्यात इमारतींच्या स्थितीचा बारकाईने आढावा घेणे आवश्यकता असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे.