मनोरमा खेडकरकडील पिस्तुल व लँड क्रुसर गाडी पौड पोलिसांनी केली जप्त
- Source : digital satta
- Jul 20, 2024
पुणे, 20 जुलै, मुळशी तालुक्यातील धडवली येथे शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर (रा. नँशनल हाउजिंग सोसायटी, बाणेर, पुणे) ची पिस्तुल आणि चारचाकी गाडी पौड पोलिसांनी जप्त केली आहे.पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरला गुरूवारी महाड येथील एका हाँटेलमधून अटक केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली होती. यावेळी खेडकरनी वापरलेली पिस्तूल आणि वाहन तसेच इतर आरोपींना अटक करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्याप्रमाणे मनोरमा खेडकरकडील पिस्तूल व लँड क्रुसर गाडी पौड पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सकपाळ, पौडचे पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव यांच्या पथकाने केली.