पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राला महिला एकेरीच्या १६ फेरीत स्थान

Image Source By : Marathi Voice

पॅरिस, ३० जुलै पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने फ्रान्सच्या प्रिथिका पावडेचा सलग चार गेममध्ये पराभूत करून महिला एकेरीच्या १६ फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयाने ऑलिम्पिकमध्ये १६ राउंडमध्ये पोहोचणारी मनिका भारतातील पहिली महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे.

सामन्याच्या पहिल्या डावात फ्रान्सच्या प्रिथिकाने आघाडी घेतली होती. अखेरच्या काळात मनिकाने शानदार खेळी करत पहिला डाव ११-९ फरकाने जिंकला. दुसऱ्या डावाची सुरूवात दोन्ही खेळाडूंनी आक्रमक पद्धतीने केली. यामध्ये खेळाडूमध्ये एका गुणांसाठी चुरशीचा खेळ झाला. दरम्यान ६-६ अशा बरोबरीत डाव असताना मनिकाने आपल्या खेळीचा वेग वाढवत प्रिथिकाला गुण पटकवण्याची संधी दिली नाही. अखेर मनिकाने दुसरा डाव ११-६ अशा फरकाने जिंकला. मिनिकाने पिथिकाचा ११-९, ११-६, ११-९, ११-७ असा पराभव केला.