पुणे - विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

Image Source By : Marathi Voice

पुणे, 9 मे  पुण्यातील प्रसिद्ध सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने विद्यार्थिनीने हॉस्टेलमधील रुममेटचे चोरून व्हिडिओ काढून आपल्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचा आरोप आहे. या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थीनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्याचीही प्राथमिक माहिती आहे.

आर्या गिरीश काळे ( रा. सीओईपी हॉस्टेल, पुणे) विनीत अजित सुराणा (रा हिंजेवाडी फेज १ पुणे ) अशी आरोपींची नावं आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीओईपी हॉस्टेल प्रशासनाकडून आम्हाला तक्रार प्राप्त झाल्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, आर्या आणि गिरीश यांचे प्रेम संबंध होते. त्यामुळे त्यांचं एकमेकांसोबत खूप बोलणं व्हायचं. तसेच, ते स्नॅपचॅट या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करत होते.