नगर - केडगावच्या शास्त्रीनगरमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी

Image Source By : Marathi Voice

अहमदनगर, 14 ऑगस्ट : केडगावमधील शास्त्रीनगरमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी नागरिकांच्या घरात येत असल्याचा आरोप करीत ड्रेनेज लाईन स्वच्छ करून देण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे.

केडगाव येथील प्रभाग क्रमांक १७ मधील शास्त्रीनगर भागामध्ये ६ ते ७ वर्षापासून ड्रेनेजलाईन टाकलेली आहे. या भागात आठशे ते एक हजार नागरिकांची लोक वस्ती असून सदर भागात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने सर्व ड्रेनेजचे घाण पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. व घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच येथील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून लवकरात लव कर ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी शिष्टमंडळासह मनपा आयुक्त यांना निवेदन दिले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम समवेत वैभव गुंजाळ,रुपेश कांबळे, संतोष डमाळे, शुभम चव्हाण, अक्षय सुर्वे, गौरव पाटोळे आदीसह नागरिक उपस्थित होते.