ठाणे महानगरपालिका मुख्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त अभिवादन
- Source : digital satta
- Aug 03, 2024
ठाणे, 3 ऑगस्ट ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.