झेलम एक्स्प्रेसच्या पाचही रेकमध्ये बदल

Image Source By : Marathi Voice

पुणे, 19 ऑगस्ट ।

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-झेलम एक्सप्रेसला नवीन एलएचबी (लिंक हॉफमन बुश) प्रकारचा रेक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. झेलम एक्स्प्रेसचे ५ रेक असून त्याच्या पाचही रेकमध्ये हा बदल करण्यात येणार आहे. २५ ऑगस्टपासून नवीन रेक जोडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सध्या ‘आयसीएफ’च्या जुनाट डब्यातून प्रवाशांची सुटका होणार आहे. ‘एलएचबी’ रेकमध्ये एकूण २२ डबे जोडण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी झेलम एक्सप्रेसच्या रेक बदलण्याची मागणी करीत होते. मात्र मध्य रेल्वेला रेक उपलब्ध होत नसल्याने हा बदल झाला नाही. आता एलएचबी रेक उपलब्ध झाल्याने रेल्वे प्रशासनाने नवीन रेक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक होण्यास मदत होणार आहे.