गोंदिया : तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

Image Source By : Marathi Voice

गोंदिया, ०८ मे  : गोंदिया जिल्ह्यातील महसुल विभागाला हादरवणारी मोठी घटना घडली असून गोरेगावचे तहसीलदार किसन के.भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे व एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

याप्रकरणाची कारवाई अगोदर गोरेगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली. या नंतर या सर्व आरोपींना पुढील तपास कारवाई करिता गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे. गोरेगांव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील फिर्यादी ने दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार आहे. यात गोरेगांवचे तहसीलदार किशन के. भदाणे, नायब तहसिलदार नागपुरे व एक खाजगी व्यक्ती गणवीरचा समावेश आहे.