अमरावती जिल्ह्यातील अनुकंपधारकांचे पालकमंत्र्यांना निवेदन
- Source : digital satta
- Aug 16, 2024
अमरावती16 ऑगस्ट
अमरावती जिल्ह्यातील अनुकंपाधारक गेल्या 10 ते 12 वर्षापासून अनुकंपा नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहोत. संदर्भींय शासन निर्णय नुसार अनुकंपाधारक यांना सरळसेवेच्या कोटयातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 टक्के पदे अनुकंपा नियुक्तीद्वारे तीन वर्षासाठी म्हणजेच दिनांक 01.01.2022 ते दि. 31.12.2024 पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतू, सदरच्या शासन निर्णन नुसार अनुकंपा नियुक्ती 1 किंवा 2 अनुकंपाधारक यांना नियुक्ती मिळत आहे. त्यामुळे कार्यालयीन प्रतिक्षासूची यादी व जिल्हा स्थरावर प्रतिक्षासूची यादी मधील अनुकंपाधारक यांची संख्या ही वाढतच जात आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीची विशेष मोहीम राबविण्या यावी अश्या मागणीचे निवेदन
जिल्ह्यातील अनुकंपधारकांनी आज चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सदरच्या शासन निर्णयनुसार दर वर्षी शेकडोच संख्येत अनुकंपाधारक वयोमर्यादेतुन बाद होत आहेत सदरच्या शासन निर्णय नुसार वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नियुक्तीपासून वंचित राहत आहेत.त्यामुळे अनुकंपा नियुक्ती योजनेचा उद्देश देखिल सफल होत नाही आहे. सद्यस्थितीत शासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार मार्च-2022 अखेर महाराष्ट्र मध्ये वर्ग क- 5,486 व वर्ग ड 3,244 असे एकूण 8,730 उमेदवार प्रतिक्षासूचीवर आहेत. सदर शासना कडे डिसेंबर, 2020 च्या अखेरी सरळसेवेने भरावण्याची फक्त वर्ग- क व वर्ग- ड ची मिळून एकूण 1,04,823 पदे रिक्त आहेत. सदर पदे ही एकूण रिक्त पदांच्या फक्त 8% असल्याचे दिसून येते तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने सन 2022 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये 75,000 इतक्या पद भरतीची शासनाने घोषणा केली होती. यामध्ये अनुकंपा उमेदवारांना एक वेळची विशेषबाब म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्याचा प्रस्तावास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीची विशेष मोहीम राबविण्या यावी अशी मागणी कऱण्यात आली आहे.