अमरावती : बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे वृद्ध महिला जागीच ठार

Image Source By : Marathi Voice

अमरावती, 9 जुलै चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सोनोरी मुख्य प्रवेशद्वारा परिसरात मंगळवारी ९ जुलै रोजी काळणीबाई धड्डू भलावी वय ७५ या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोनोरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात दुपारी ही थरारक घटना घडली. वृद्ध महिला कामानिमित्त रस्ता ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात असतांना बसचालकाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ‌ वृद्ध महिला बसच्या धडकेत खाली पडली आणि बसचा मागच्या बाजूचा चाक वृद्ध महिलेच्या शरीरावरून गेल्याने तिचा जागीच दुर्दवी मृत्यू झाला अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

यावेळी ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास राठोड सह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता या घटनेची माहिती घेतली आणि वृद्ध महिलेच शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुंगणालय येते पाठविण्यात आले.

चांदूर बाजार आगरातील एम.एच.१४-बिटी ९६०८ या क्रमांकाची बस नोनोरी,सोनोरी,निमखेड या गावला जात होती. या बस मध्ये २० ते ३० प्रवासी होते. बस चालक अतुल नारायण पावसे वय ३८ रा गुणवंतवाडी अमरावती या ब्राम्हणवाडा पोलिसांना ताब्यात घेतले. यासह बस सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली. मृतक वृद्ध महिला मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आठणेर तालुक्यातील आहे. तर मृतक वृद्ध महिला तिची मुलीगी ममता रमेश उकेच्या घरी सोनोरी येथे आली होती. ममता रमेश उके या महिलेने या घटनेची तक्रार केली असता आरोपी बस चालक अतुल पावसे यांच्यावर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास ब्राम्हणवाडा थडी पोलीस करित आहे.