'नेता गीता' २३ ऑगस्टपासून चित्रपटगृहात
- Source : Digital Satta
- Jul 23, 2024
कॉलेज जीवनात तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. या उत्साहातच कॉलेजच्या निवडणुका लढवल्या जातात. अशाच एका निवडणुकीच्या निमित्ताने घडणारी मनोरंजक गोष्ट नेता गीता या चित्रपटातून उलगडणार आहे. भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे. या चित्रपटातही याचा काहीसा अनुभव आपल्याला मिळणार असून कॉलेजमधील प्रेमप्रकरण, मैत्रीचे समीकरण, राजकरण यासर्वांसोबतच गीतेचे प्रवचन आपल्याला अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून कथानकातला ताजेपणा व्यक्त होत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच नेता गीता प्रेक्षकांची पसंती मिळवेल यात शंका नाही